Prachin Sanhita Gurukul

ज्ञानसंकुल विद्यार्थी संघ संचालित व वैद्य पाटणकर हरिश प्रेरित

प्राचीन संहिता गुरूकुल - १०वे पुष्प
अभ्यासात् प्राप्यते दृष्टी कर्मसिद्धी प्रकाशिनी |  


आयुषो वेद: आयुर्वेद: |

आयुर्वेद हे शास्त्र जगण्याचं अनुभवण्याचं शास्त्र!
या शास्त्र अभ्यासामध्ये दृष्टीला फार महत्व आहे. ज्या दृष्टीने आपण या शास्त्राकडे पाहू  तसा दृष्टिकोन हे शास्त्र आपल्याला देत असतं.
निसर्गाच्या कुशीत  तयार झालेले हे शास्त्र निसर्गाच्याच सानिध्यात राहून शिकलं तर नक्कीच या शास्त्राकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देत.
म्हणूनतर आदरणीय आचार्य वाग्भट म्हणतात...
"अभ्यासात प्राप्यते दृष्टी कर्मसिद्धी प्रकाशीनी!!"

गुरुवर्यांच्या सानिध्यात राहून आयुर्वेद विषयी एक निर्मळ दृष्टी निर्माण करणं हे ध्येय घेऊन आधुनिक युगातील 'प्राचीन सहिता गुरुकुल' ही संकल्पना उभी राहिली. मागील ९ पुष्पातून आपण हा ज्ञानयज्ञ अखंडित पणे चालू ठेवला आहे. प्राचीन संहिता गुरुकुलाचे १०वे पुष्प जाहीर करत असताना मनोमन आनंद होत आहे.
निसर्गाविषयी प्रेम, निसर्गासोबत करावयाची देवाण-घेवाण जागृत करण्याचा एक प्रयत्न!!शहरी जीवनात हरवू पाहणाऱ्या मनाला संतुलित करण्यासाठी उभारलेला एक मनोरथ!! प्राचीन काळातील आयुर्वेद अध्ययन पद्धती पुनरुज्जीवित करण्यासाठी केलेली एक धडपड!!

आपण साडेपाच वर्षांचा आयुर्वेद अभ्यासक्रम शिकतो पण त्यातील किती दिवस आयुर्वेद खऱ्या अर्थाने जगतो.हे जगून अनुभवण्याचे शास्त्र निसर्गात मुक्त मनाने,गुरूंच्या सहवासात राहूनच सिद्धी प्राप्त करून देईल. प्राचीन संहिता गुरुकुलाच्या दहाव्या पुष्पा मध्ये सर्व आयुर्वेद विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देत आहोत. ब्राह्ममुहूर्तावर उठून निंबकाष्ठाने दंतधावन करण्यापासून ते उटण्याने स्नान,योगाभ्यास, संस्कृत संभाषण,नौकाविहार, वनस्पती दर्शन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विविध गुरुवर्यांच्या दृष्टीतून आयुर्वेद ग्रंथांचं वाचन!!
ही संधी दवडू नका.... आयुर्वेद अनुभवण्याची जगण्याची !!

दि. ०३.११.२०१९ ते ०७.११.२०१९

स्थळ -  कृषी विज्ञान केंद्र बारामती व श्री क्षेत्र सोनेश्वर मंदिर सोनगाव बारामती जिल्हा पुणे

नावनोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर फॉर्म जमा करावा.
https://forms.gle/CPoWuQdBo2KAT5Py8

संपर्क :-

वैद्य विवेक आंबरे 88067 45884
वैद्य ओमप्रसाद जगताप 8867343202
वैद्य स्वप्निल भाकरे  96042 01582
वैद्य निलेश ढवळे  90497 42453
वैद्य रोशन चौहान  83788 57258
वैद्य विनिता थोळे  94203 42819
वैद्य शिवानी काटकर  97730 93076
वैद्य रीचा अग्रवाल 83 79 901500